Home > Max Political > मुलांना घरात कोंडून आई घर वाचवण्यासाठी आझाद मैदानात

मुलांना घरात कोंडून आई घर वाचवण्यासाठी आझाद मैदानात

मुलांना घरात कोंडून आई घर वाचवण्यासाठी आझाद मैदानात
X

आपल्या बाळासाठी गडावरून उतरणाऱ्या हिरकणीची कहाणी आपल्याला माहिती आहे. मात्र आपलं घर वाचावं म्हणून वरळीतील मरियममा नगर येथील महिला आपल्या मुलांना घरात कोंडून आझाद मैदानात आंदोलन करीत आहे.

यावेळी या महिलेशी बातचीत केल्यानंतर तिने सांगितले की, माझा नवरा सकाळीच कामावर जातो. माझी सासूही वारली आहे. घरात मुलांना सांभाळण्यासाठी कुणीच नाही. आता जर हे घरही जाणार असेल तर आम्ही राहायचं कुठं? त्यामुळे शेवटी छोट्या चिमुकल्यांना घरी ठेऊन घर वाचवण्यासाठी आझाद मैदानात आले आहे.

या मारियममा नगर येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आमच्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे. त्यामुळे आम्हाला धमकावलं जात आहे. या जागेवरून आम्हाला हटवून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितलं जात आहे. पण जर आम्हाला इथून हलवायचं असेल तर किमान आम्हाला transit camp तरी बांधून द्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आमच्याकडे बिल्डरचे लोक येतात, आम्हाला धमकवतात आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर आमची तक्रारही घेत नाहीत, अशी आमची भयंकर अवस्था झाली असल्याचे नागरिक सांगतात.

माझं बालपण इथंच गेलंय. मी तिथेच मोठी झाले. माझं लग्नसुद्धा तिथंच झालं आणि माझा नवरा सुद्धा तिथच मेला. त्यामुळं आम्हाला साधी झोपडी जरी दिली तरी आम्ही सुखाने संसार राहू. कारण आमचं हातावर पोट आहे. आम्हाला हे सात लाख देणार त्यात आम्ही घर कुठं घ्यायचं आणि काम कुठं करायचं, असा प्रश्न आहे. त्यामुळं आम्हाला इथच राहू द्या, अशीही मागणी केली जात आहे.

Updated : 1 Jun 2023 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top