Home > Max Political > Raj Thackeray | मराठी कलाकारांनी एकमेकांना सन्मान द्यावा

Raj Thackeray | मराठी कलाकारांनी एकमेकांना सन्मान द्यावा

Raj Thackeray | मराठी कलाकारांनी एकमेकांना सन्मान द्यावा
X

मराठी कलाकारांनी एकमेकांना सन्मान दिलाच पाहिजे. अरे तुऱ्याची भाषा न करता अहो-जावो ची भाषा वापरली पाहिजे. सह कलाकाराला टोपण नावानं हाक मारणे हा कसला प्रकार? असं मत राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांच्या बाबतीत व्यक्त केले. वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सह कलाकारा सोबत आपण आपल्या चार भिंतीच्या आत कसेही बोलतो, तसंच बोलणं कामाच्या ठिकाणी अथवा चारचौघात, स्टेजवर बोलू नये. असा देखील सल्ला राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना दिला.

दक्षिणात्य कलाकारांकडून एकमेकांना सन्मान कसा दिला जातो हे पाहिल्यानंतर ही पद्धत मराठी सिनेसृष्टीत का नाही हा प्रश्न पडतो? दक्षिणात्य कलाकारांकडून सहकलाकाराला सन्मान आणि सन्मानपूर्वक वागणूक कशी दिली पाहिजे हे मराठी सिने सृष्टीतील कलाकारांनी पाहिलं पाहिजे. असं देखील मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

पुणे येथील पिंपरी चिंचवड मध्ये चालू असलेल्या शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. आणि संबंधित विषयाला अनुसरून लवकरच मराठी कलाकारांची बैठक देखील बोलवणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

Updated : 8 Jan 2024 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top