Top
Home > Max Political > मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी: आशिष शेलार

मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी: आशिष शेलार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काल शरद पवार आणि आशिष शेलारांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमातून तर्कवितर्कांना उधान आला आहे. पत्रकार ज्ञानेश महारावांनी आशिष शेलारांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केल्यानंतर शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी: आशिष शेलार
X

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्वान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. "संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं," असं शेलार यांनी सांगितलं.

यावेळी शेलार यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने लढवय्या मराठा स्त्रियांच्या संघर्षाचा आढावा घेतला. एखाद्या व्यक्तीने पीएचडी करावं आणि त्यावर मुंबई विद्यापीठात संशोधन व्हावं, असं हे पुस्तक असल्याचं शेलार म्हणाले. तसेच चोरमारे यांनी हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.


Updated : 2020-11-21T14:22:26+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top