Top
Home > Max Political > शेलार, संघाची सरसंघचालक मराठा महीला करा: सचिन खरात

शेलार, संघाची सरसंघचालक मराठा महीला करा: सचिन खरात

आशिष शेलारजी, आपण मोहन भागवत यांना सरसंघचालक पदावरून पायउतार होऊन त्या पदावर महाराष्ट्रातील #मराठा स्त्रीची #सरसंघचालक पदी निवड करावी अशी मागणी करावी व आपण स्त्री पुरुष समानतेचे खरंखरोच पाठीराखे आहोत असे महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे आवाहन रिपाई नेते सचिन खरात यांनी केला आहे.

शेलार, संघाची सरसंघचालक मराठा महीला करा: सचिन खरात
X

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्वान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं," असं शेलार यांनी सांगितलं होतं. यावरुन आता तर्कवितर्कांना उधान आलं असून सचिन खरात यांनी मोहन भागवत यांना सरसंघचालक पदावरून पायउतार होऊन त्या पदावर महाराष्ट्रातील मराठा स्त्रीची सरसंघचालक पदी निवड करावी अशी मागणी केली आहे.


Updated : 2020-11-21T14:23:05+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top