Home > Max Political > भाजप आमदाराची हिंमत बघा, थेट सर्वोच्च न्यायालयावर केली टीका

भाजप आमदाराची हिंमत बघा, थेट सर्वोच्च न्यायालयावर केली टीका

भाजप आमदाराची हिंमत बघा, थेट सर्वोच्च न्यायालयावर केली टीका
X

सर्वोच्च न्यायालयाबाबत वक्तव्यं करतांना किंवा मत व्यक्त करतांना प्रत्येकजण सांभाळून बोलत असतो. ही आजवरची परंपरा आहे. मात्र, भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी या परंपरेलाच हरताळ फासलाय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मणिपूर इथल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर घेतलेल्या भूमिकेवर भाजप आमदार भातखळकर यांनी वादग्रस्त वक्तव्यं केलंय.

दोन महिलांना विवस्त्र करून मणिपूरमध्ये त्यांची धिंड काढण्यात आली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. देशभरातून नेटिझन्सनी याविरोधात रान पेटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी सरकारची भूमिका मांडली. तर दुसरीकडे स्वतः सर्वोच्च न्यायालयानंच या व्हायरल व्हिडिओची दखल घेत मणिपूर सरकारला थेट इशाराच दिला आहे. या घटनेशी संबंधित गुन्हेगारांवर तातडीनं कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलतांना भाजपच्या अतुल भातखळकरांचा तोलच गेला आणि त्यांनी ‘सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा,” असं वादग्रस्त वक्तव्यं केलंय.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विटच केलंय. त्यात ते म्हणाले, “सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल, तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, असं वादग्रस्त ट्विटच त्यांनी केलंय.

Updated : 21 July 2023 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top