Home > Max Political > Loksabha Election Date : लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार या दिवशी, निवडणूक आयोगाच्या बैठकीत कुठल्या मु्द्द्यांवर होणार चर्चा ?

Loksabha Election Date : लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार या दिवशी, निवडणूक आयोगाच्या बैठकीत कुठल्या मु्द्द्यांवर होणार चर्चा ?

१५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या महत्वपूर्ण बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगामधील दोन आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर आचारसंहिता लावण्याचा मार्ग मोकळा होईल.

Loksabha Election Date : लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार या दिवशी, निवडणूक आयोगाच्या बैठकीत कुठल्या मु्द्द्यांवर होणार चर्चा ?
X

केंद्रीय निवडणूक आयोगामधील निवडणूक आयुक्तांच्या २ जागा भरण्यासंदर्भात १५ मार्च रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येतील आणि त्यानंतर सोमवारी (१८ मार्च) रोजी आचारसंहिता लागू करण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.

निवडणूक आयोगाकडून आयुक्तांच्या २ दोन जागा भरण्यात येणार

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या अचानक राजीनाम्यामुळे आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र यांनी घेतलेल्या निवृत्तीनंतर लोकसभा निवडणूकीच्या अगदी तोंडावर आयुक्तांच्या २ जागा ह्या रिकाम्या झाल्या आहेत. या दोन निवडणूक आयुक्तांच्या जागा भरण्यासंदर्भात १५ मार्च रोजी महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

केंद्रीय कायदेमंत्री अर्जून राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या पद नियुक्ती संदर्भात समिती स्थापित करण्यात येणार असून या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी ५ नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे(DOPT) सचिव यांचा समावेश असणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि केंद्रीय मंत्री अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपतींकडून निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होईल.

१८ मार्च नंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा

केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी १५ मार्च रोजी होणार असून त्यांनतर शनिवार आणि रविवार यादिवशी सुट्टी असेल त्यामूळे सोमवारी, १८ मार्चला किंवा त्यानंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकसभेच्या जागावाटपाविषयी चर्चा सुरूच

लोकसभेच्या निवडणूका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाविषयी चर्चा सुरू आहेत. येत्या एक दोन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Updated : 11 March 2024 11:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top