Home > Max Political > लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी दिली ब्रेकिंग न्यूज, भाजपच्या वाढू शकतात चिंता,

लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी दिली ब्रेकिंग न्यूज, भाजपच्या वाढू शकतात चिंता,

Loksabha 2024: सपा ( समाजवादी पार्टी ) प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की भाजप आणि भाजप खासदारांविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता भाजपमध्ये नव्या उमेदवारांचा शोध सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी दिली ब्रेकिंग न्यूज, भाजपच्या वाढू शकतात चिंता,
X

लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी दिली ब्रेकिंग न्यूज, भाजपच्या वाढू शकतात चिंता,Loksabha 2024: सपा ( समाजवादी पार्टी ) प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की भाजप आणि भाजप खासदारांविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता भाजपमध्ये नव्या उमेदवारांचा शोध सुरू आहे.

UP Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. भाजप यूपीमधील सर्व विद्यमान खासदारांची तिकिटे कापणार असल्याचा दावा सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. यासोबतच अखिलेश यादव म्हणाले की, भाजप खासदारांनी कधीही त्यांच्या मतदारसंघाकडे पाहिले नाही, त्यांनी परीक्षा दिली नाहीतर रिपोर्ट कार्ड कसे बनणार.

सपा प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले की - "ब्रेकिंग न्यूज, सूत्रांचा हवाला देत, अशी माहिती मिळाली आहे की भाजप एक वगळता उत्तर प्रदेशातील आपल्या सर्व विद्यमान खासदारांची तिकिटे कापणार आहे, फक्त एक जन वगळता. परंतू असे ऐकायला मिळत आहे की ते देखील निवडनूक लढवण्याकरीता ऐका अश्या जागेच्या शोधात आहेत, जि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे.




अखिलेश यादव यांनी पुढे लिहिले - "म्हणूनच उत्तर प्रदेशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या स्थितीत नाही कारण त्यांच्या विद्यमान खासदारांनी खिसे भरण्याशिवाय कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळेच देशातील जनतेत भाजप आणि भाजप खासदारांच्या विरोधात प्रचंड रोष आहे, या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नवीन उमेदवारांचा शोध सुरू आहे, पण हरण्यासाठी कोणालाच लढायचे नाही, त्यामुळे एकाचेही नाव उमेदवार म्हणून भाजपकडून पुढे आलेलं नाही.

सपा प्रमुख पुढे लिहितात - "भाजप खासदारांनी कधीच त्यांच्या मतदारसंघाकडे पाहिले नाही. त्यांनी परीक्षा दिली नाही तर रिपोर्ट कार्ड कसे बनणार. भाजपचे तिकीट कापण्यापूर्वी जनतेनेच त्यांचे नाव काढून टाकले आहे. यावेळी उत्तर प्रदेशची जनता नुसते बोलणाऱ्यांना निवडून देणार नाही, तर खरे आणि चांगले काम करणाऱ्यांना निवडून देणार आहे.

आता पीडीएची एकजूट जागृत झाली आहे,

भाजप युपी सोडून पळून गेला आहे!




Updated : 2 Feb 2024 9:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top