Home > Max Political > लोकसभेच्या निवडणूका महिना दिड महिन्यात होणार - प्रकाश आंबेडकर

लोकसभेच्या निवडणूका महिना दिड महिन्यात होणार - प्रकाश आंबेडकर

लोकसभेच्या निवडणूका महिना दिड महिन्यात होणार -  प्रकाश आंबेडकर
X

आगामी लोकसभेच्या निवडणूकीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत केलं आहे. लोकसभेच्या निवडणूका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो असं जुजबी वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की "आम्ही लोकसभा निवडणूकीच्या तयारी लागलो आहोत. भाजपच्या विरोधात लढू. आमचे उमेदवार उभे करू, असं प्रकाश आंबेडकर मीडियाशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

Updated : 10 Aug 2023 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top