Home > Max Political > महानायक अमिताभ यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर...!

महानायक अमिताभ यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर...!

महानायक अमिताभ यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर...!
X

आपल्या अभिनयाने दोन पिढ्यांचा लाडका अभिनेता असलेला महानायक अमिताभ बच्चन यांनामास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान विश्वस्त संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "लता दीनानाथ मंगेशकर" या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली.

मागील 34 वर्षांपासून या संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान केले जातात. तर गेल्या तीन वर्षांपासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानेही मान्यवरांचा गौरव केला जातो. या वर्षी या विशेष पुरस्कारासाठी पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या वर्षी आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. त्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

कधी होणार हा पुरस्कार सोहळा?

यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पु.), मुंबई येथे बुधवार 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. असेल. वरील सर्व पुरस्कार अध्यक्ष आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जातील.

यावेळी हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, मास्टर दीनानाथजींचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून अतुलनीय योगदान असून महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ मंगेशकर परिवार दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आनंद आहे.

Updated : 16 April 2024 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top