Home > Max Political > प्रियंका गांधी यांना अटक: शरद पवार यांनी का टाळला प्रियंका गांधी यांचा उल्लेख

प्रियंका गांधी यांना अटक: शरद पवार यांनी का टाळला प्रियंका गांधी यांचा उल्लेख

प्रियंका गांधी यांना अटक: शरद पवार यांनी का टाळला प्रियंका गांधी यांचा उल्लेख

प्रियंका गांधी यांना अटक: शरद पवार यांनी का टाळला प्रियंका गांधी यांचा उल्लेख
X

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेवर शरद पवार यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येबाबत सरकारवर निशाणा साधताना या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडशी केली.

यावेळी पवार यांनी प्रियांका गांधी यांचा उल्लेख टाळला. प्रियंका गांधी लखीमपूर येथील नागरिकांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर पवार यांनी प्रियंका गांधी यांचा थेट उल्लेख करणं टाळलं.

'दिल्ली के कुछ नेता' एवढाच उल्लेख पवार यांनी यावेळी केला. पत्रकारांनी प्रियांका गांधी यांच्यावर प्रश्न केल्यानंतर असता देखील पवार यांनी छत्तीसगड,पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. मात्र, प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या घटनेवर पवारांनी थेट भाष्य करण्याचे टाळले.

दुसरीकडे यावेळी या सर्व प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन का असा सवाल पवार यांना केला असता, केंद्र सरकार असो अथवा उत्तर प्रदेशचं मोदी सरकार असो हे दोनही सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप पवार यांनी केला. तसंच या सर्व घटनेवर विरोधक एकत्र आले तर आपण राष्ट्रपतींची भेट घेऊ अशी माहिती देखील पवार यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकऱ्यावर गाडी चालवली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्यापर्यंत अटक झालेली नाही. त्यामुळे अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या आणि आशिषला अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली जात आहे.

यावेळी पवार यांनी भाजप शासित यूपी सरकार आणि केंद्र सरकार लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेला पूर्णपणे जबाबदार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर या घटनेचा केवळ आम्ही निषेध करुन शांत बसणार नाही. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी. अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

काय आहे प्रकरण?

रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.

Updated : 5 Oct 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top