Home > Max Political > किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी

किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असेलेल्या किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांची पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी केली आहे.

किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी
X

किरेन रिजिजू आपल्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत होते. त्यातच कॉलेजियमवरून किरेन रिजिजू आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आमने-सामने आले होते. त्यातच किरेनरिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयावर अनेकदा टीका केल्याचेही पहायला मिळाले. त्यानंतर अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील कायदा मंत्री पदावरून किरेन रिजिजू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरून पृथ्वी व विज्ञान (Earth And Science ministry) मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. यासंदर्भात किरण रिजिजू यांनीही आपल्या ट्विटरच्या प्रोफाईलवरून कायदा मंत्री हे पद काढले आहे.

किरेन रिजिजू यांना पृथ्वी विज्ञान (Earth Science ministry) मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आल्यानंतर त्यांनी

ट्वीट केले आहे. यामध्ये किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( यांच्या नेतृत्वात कायदा मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडता आली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायमुर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वकील आणि अधिकारी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. ती मी निष्ठेने पूर्ण पार पाडील, असं मत किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.

Updated : 18 May 2023 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top