Home > Max Political > करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
X

करूणा शर्मा प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा शर्मा यांच्यामध्ये वाद सुरु आहे.

याच संदर्भात करुणा शर्मा रविवारी (5 सप्टेंबर) ला परळी येथे आल्या होत्या. त्या धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही गोष्टी उघड करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्या अगोदरच त्यांना Atrocity कायद्याखाली अटक करण्यात आली. परळी येथील काही महिलांनी त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

या सर्व वादावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया ट्वीटर द्वारे दिली आहे.



अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची!!

अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारी 2021 ला करुणा शर्मा यांच्यासोबत माझे 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत. अशी जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर राज्यात धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्या नात्याबाबत माहिती समोर आली होती.


Updated : 7 Sep 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top