Home > Max Political > स्मशानयात्रा करणारे सतीश जारकीहोळी कर्नाटकचे मंत्री

स्मशानयात्रा करणारे सतीश जारकीहोळी कर्नाटकचे मंत्री

कर्नाटकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सतीश जारकीहोळी यांना सिद्धारामैया सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

स्मशानयात्रा करणारे सतीश जारकीहोळी कर्नाटकचे मंत्री
X

हिंदू धर्मात राहू काळ हा अशुभ मानला जातो. हा राहू काळ सुरु असतानाच विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरून विजयी होत सतिश जारकीहोळी आमदार बनले. तर सिध्दारामैया सरकारमध्ये सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत मंत्रीपदाची शपथ घेतली.

बेळगाव जिल्ह्यातील अठरापैकी तब्बल ११ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील यमनकर्डी मतदारसंघाचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. एवढंच नाही तर त्यांना बेळगावचे पालकमंत्रीही करण्याची शक्यता आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असतात. पुढारी बुवा-बाबांच्या नादी लागलेले पदोपदी पाहायला मिळतात. मात्र, आपण त्याला अपवाद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

कॅबिनेट बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली.

कोण आहेत सतीश जारकीहोळी?

सतीश जारकीहोळी हे यमनकर्डीचे आमदार आहेत. त्याबरोबरच ते माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे सख्खे भाऊ आहेत. रमेश हे गोकाक मधून, तर भालचंद्र हे आरभावीमधून निवडून आले असून, लखन हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. परंतु हे तिघेही भाजपमध्ये असून, एकमेव सतीश हे काँग्रेसमध्ये आहेत.

अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील सीमाभागातील ते आघाडीचे कार्यकर्ते आहेत. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम स्मशानभूमीत घेऊन भयमुक्त समाजनिर्मितीसाठी ते प्रयत्न करतात. बारावीपर्यंत शिकलेले सतीश हे सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते होते.

पुनर्रचनेत यमकनमर्डी मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित या मतदारसंघात ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत एकाही गावात प्रचाराला न जातादेखील ते निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी उत्पादन शुल्क व लघुउद्योग खात्याच्या मंत्रिपदासह बेळगावच्या पालकमंत्री पदाची धुरा समर्थपणे सांभाळली.

Updated : 22 May 2023 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top