Home > Max Political > राहुल गांधीचं भाषण आणि ज्योतिरादित्य सिंधिया चा पाठींबा

राहुल गांधीचं भाषण आणि ज्योतिरादित्य सिंधिया चा पाठींबा

राहुल गांधीचं भाषण आणि ज्योतिरादित्य सिंधिया चा पाठींबा
X

सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. मात्र, हे कायदे रद्द करण्यास केंद्र सरकार तयार नाही.

यावरून मोदी सरकार कशा प्रकारे उद्योगपतींची मदत करत आहे? या संदर्भात राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर अपलोड केला आहे.

या व्हिडीओत राहुल गांधी मोदी सरकारच्या नितीवर निशाणा साधत असताना त्यांच्या शेजारी बसलेले तत्कालीन कॉंग्रेस नेते आणि आत्ता भाजप मध्ये असलेले नेते ज्योतिरादित्य सिंधीया बाक वाजवत आहे. तसंच मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राहुल गांधींच्या भाषणाला पाठींबा देत आहेत.

दरम्यान 2020 ला राहुल गांधी यांनी केलेल्या 2015 च्या भाषणाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची जमीन उद्योगपतींना देत आहेत. असा आरोप करत आंदोलन करत आहेत.

2015 मधील भाषणात राहुल गांधी लोकसभेत हाच मुद्दा मांडत असून मोदी सरकार उद्योगपतींना शेतकऱ्यांची जमीन देणार आहे. असा आरोप करत आहेत. आणि ज्योतिरादित्य सिंधिया राहुल गांधींना पाठींबा देत बाक वाजवत आहेत.

त्यानिमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो. ज्या प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोदी विरोधात बाक वाजवत पाठिंबा दिला. त्याच प्रश्नावर आता सिंधिया काही बोलताना दिसत नाही. यावरून पक्ष बदलला की शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या बाबत नेते कशी आपली भूमिका बदलतात. हेच या निमित्ताने दिसून येतं.

Updated : 10 Jan 2021 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top