Home > Max Political > जम्मू-कश्मीर: पंतप्रधानांची सर्व पक्षीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता...

जम्मू-कश्मीर: पंतप्रधानांची सर्व पक्षीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता...

जम्मू-कश्मीर वर पंतप्रधानांसोबत जम्मू कश्मीरच्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक, बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याती शक्यता

जम्मू-कश्मीर: पंतप्रधानांची सर्व पक्षीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता...
X

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जम्मू कश्मीर च्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीपुर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जम्मू-कश्मीरमधील सध्याच्या स्थितीची मोदींना माहिती दिली. पंतप्रधान निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीत 14 नेत्यांना बोलावण्यात आलं आहे.

जम्मू कश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर अद्यापपर्यंत या ठिकाणी निवडणूका झालेल्या नाहीत. त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 रद्द करत जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन केलं होतं. कलम 370 रद्द करताना केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला होता. तेव्हापासून या ठिकाणी राष्ट्रपती शासन लावण्यात आलं आहे. मात्र, या ठिकाणी आता निवडणूका होण्याची चिन्हं आहेत.

जम्मू आणि कश्मीरचं विभाजन करताना राज्य सरकारने जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा कायम ठेवली आहे. तर केंद्रशासीत प्रदेश लडाखमध्ये विधानसभा नसेल असं जाहीर केलं होतं. मात्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निर्मिती केली असली तर या ठिकाणी अद्यापपर्यंत निवडणूका झालेल्या नाहीत.

दरम्यान या 14 नेत्यांनी आपण पुन्हा एकदा 370 कलम हटवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार असल्याचं म्हटलं आहे.

बैठकीत सहभागी झालेले नेते...

बैठकीत 4 माजी मुख्यमंत्र्यांसह 14 नेत्यांचा समावेश आहे. नॅशनल कॉंफरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, कॉंग्रेस चे नेते गुलाम नबी आजाद, पीडीपी च्या नेत्या महबूबा मुफ्ती, भाजपचे नेते निर्मल सिंह, कविंद्र गुप्ता, पीपुल्स कांफ़्रेंस चे मुजफ्फर बेग आणि सज्जाद लोन, CPIM चे मोहम्मद युसूफ तारिगामी तसंच जेके अपनी पार्टी चे अल्ताफ बुखारी या नेत्यांचा समावेश आहे.

Updated : 24 Jun 2021 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top