Home > Max Political > महापूर: जयंत पाटील पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेटीला...

महापूर: जयंत पाटील पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेटीला...

महापूर: जयंत पाटील पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेटीला...

महापूर: जयंत पाटील पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेटीला...
X

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.

दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणावर होऊ पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील. अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे.

जयंत पाटील यांनी 19 जुलैला बसवराज बोम्मई यांची भेट घेतली होती. या भेटीत पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी एक बैठक पार पडली होती.

या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापध्दतीने करता येईल आणि त्यात कोणत्यापध्दतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा याची चर्चा झाली होती.

२०१९ चा पूर लक्षात घेता, गतवर्षी अचूक नियोजन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापूराचा करेक्ट कार्यक्रम केला होता. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसला. मात्र, या नियोजनामुळे याची तिव्रता कमी राहिल्याचा दावा केला आहे.

Updated : 6 Aug 2021 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top