Home > Max Political > महात्मा फुले यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांचा शिवसमाधीबाबत दावा- जयंत पाटील

महात्मा फुले यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांचा शिवसमाधीबाबत दावा- जयंत पाटील

महात्मा फुले यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांचा शिवसमाधीबाबत दावा- जयंत पाटील
X

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची राज्यभरात चर्चा आहे. तर या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावा केला. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. (Raj Thackeray Rally in Aurangabad)

गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढल्याची टीका केली आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 1999 पुर्वी महाराष्ट्रात जातीचा अभिमान होता. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. तर शरद पवार यांनी लोकांच्या डोक्यात जातीचे विष पेरल्याची टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली. (Jayant patil give answer to Raj Thackeray)

याबरोबरच राज ठाकरे म्हणाले होते की, शरद पवार लेखकाची जात बघुन इतिहासाचे संदर्भ देतात. तसेच बाबासाहेब पुरंदरे ब्राम्हण असल्यानेच शरद पवार यांनी त्यांना त्रास दिला अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. तर लोकमान्य टिळक यांनी शिवसमाधी बांधल्याचा दावाही राज ठाकरे यांनी या सभेत केला. त्याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

जयंत पाटील म्हणाले, महात्मा फुले ओबीसी होते. महात्मा फुले यांनी शिवसमाधी शोधून काढल्याचा इतिहास आहे. मग राज ठाकरे ओबीसी असलेल्या महात्मा फुले यांचे कार्य दुर्लक्षित करण्यासाठी तर हा दावा करत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे ईडी किंवा इन्कम टॅक्सचा दबाव असल्यामुळे तर भाजपची स्क्रीप्ट बोलत नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली. कारण सध्या देशात महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न असताना एकाही मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली नाही, असे म्हणत राज ठाकरे भाजपची स्क्रीप्ट बोलत असल्याची टीका केली.

Updated : 2 May 2022 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top