News Update
Home > Max Political > दोनदा पंतप्रधान होणे पुरेसं नाही, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य

दोनदा पंतप्रधान होणे पुरेसं नाही, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य

सध्या देशात असलेल्या महागाई, बरोजगारी यांमुळे विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी दोनदा पंतप्रधान होणं पुरेसं नसल्याचे वक्तव्य केले आहे.

दोनदा पंतप्रधान होणे पुरेसं नाही, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
X

देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरले आहे. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी गुजरात सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी दोनदा पंतप्रधान होणं पुरेसं नसल्याचे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक दिवस मला राजकारणातील मोठे नेते भेटले. ते राजकीयदृष्ट्या आमचे विरोधक आहेत. पण मी त्यांचा आदर करतो. परंतू काही बाबतीत ते माझ्यावर खूश नव्हते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. मात्र मी त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोदीजी तुम्ही दोन वेळा पंतप्रधान झाला आहात. यापेक्षा अजून काय हवं? असा सवाल केला. कारण त्या नेत्याच्या दृष्टीने दोन वेळा देशाचे पंतप्रधान होणे हे सर्वकाही आहे, असे मत होते.

पुढे मोदी म्हणाले की, मी दोनदा पंतप्रधान झालो आहे. पण ते पुरेसं नाही. कारण मी कोणत्या धातूपासून बनलो आहे त्याबाबत मला जास्त काही माहिती नाही. पण मी गुजरातच्या भुमीने मला घडवले आहे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

मोदी पुढे म्हणाले, मला जे वाटत होते ते मी झालो आहे. त्यामुळे मी विश्रांती घ्यावी, असे मला वाटत नाही. कारण मला लोकहिताच्या योजना 100 टक्के लोकांपर्यंत पोहचवायचे स्वप्न आहे. त्यामुळे दोनदा पंतप्रधान होणं पुरेसं नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Updated : 13 May 2022 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top