Home > Max Political > विधानपरिषद निवडणूक : शिवसेना आमदारांची नाराजी? काँग्रेसची धाकधूक वाढली

विधानपरिषद निवडणूक : शिवसेना आमदारांची नाराजी? काँग्रेसची धाकधूक वाढली

विधानपरिषद निवडूणीसाठी मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शिवसेना आमदार काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानपरिषद निवडणूक : शिवसेना आमदारांची नाराजी? काँग्रेसची धाकधूक वाढली
X

विधानपरिषद निवडणूकीत मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शिवसेना आमदार काँग्रेसवर नाराज असून ते काँग्रेसला मतदान करणार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची मतं फोडून भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीकडून सावधगिरीने पावलं टाकण्यात येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना आमदार काँग्रेसवर नाराज असून ते काँग्रेसला मतदान करणार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकमेकांशी चांगला संवाद आहे. एवढंच नाही तर कोणी कुणाला मतदान करावं हेसुध्दा फायनल झालं आहे. मात्र भाजपकडून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. भ्रम निर्माण केले जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कितीही भ्रम निर्माण केला आणि अफवा पसरवल्या तरी त्यांना फळ मिळणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले की, राज्यघटनेने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. याबाबतची घटनेची कलमं तुम्ही पहा. परंतू लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांची आमदारकी शाबूत असणाऱ्या दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवलं जात आहे. त्यांना कोणत्या न्यायाने मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. कोणत्या कलमाखाली मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला, याबाबत संभ्रम आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

302 कलमाखाली अटक असलेल्या कैद्यांनाही मतदानाचा अधिकार

संजय राऊत यावेळी म्हणाले की, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. मात्र या देशात 302 कलमाखाली अटक असलेल्या गुन्हेगारांनाही मतदानाचा अधिकार असतो. कारण तो त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Updated : 19 Jun 2022 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top