Home > Max Political > भाजपा सहकार विरोधी आहे का?

भाजपा सहकार विरोधी आहे का?

भाजपा सहकार विरोधी आहे का?
X

राज्यातील सहकार कारखान्यांवर आयकर विभागाच्या पडत असलेल्या धाडी. त्याच महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रश्न मांडण्यासाठी भाजपच्या सहकार क्षेत्राशी संबंधित असलेल्या नेत्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आरोपांना त्रासून अजित पवारांनी साखर कारखान्यांची यादी वाचून सहकार आणि साखर कारखानदारी धोक्यात आणलंय का? सहकारामध्ये साफसफाईची गरज आहे का? भाजपा सहकार विरोधी आहे का? या सगळ्यांचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्राच्या एक्स्प्लेनर व्हिडीओमधे....

विनासहकार नाही उध्दार असं बीदवाक्य असलेल्या सहकाराला गेल्या काही दिवसात उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतेक सहकारी संस्था कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना केंद्रीय तपास संस्थांनी या संस्थाविरोधात चौकशी आणि धाडसत्र आरंभरले आहे.

महाराष्ट्राच्या धाडसत्रानंतर दिल्लीमधे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सहकारी नेत्यांची भेट झाली. त्यानंतर धाडी केंद्राच्या दबावामुळे पडल्याचा आरोप होत असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, "जिथे भ्रष्टाचार झाला आहे त्या ठिकाणी तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. अनेक प्रकरणं न्यायालयात असल्यामुळे तपास यंत्रणांना कारवाई करावी लागते आहे."अनेक ठिकाणी काळा पैसा पांढरा केला गेला आहे. त्यातून प्रॉपर्टी घेण्यात आल्या आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई केली पण त्यांचं काहीच नाहीये अशी एखादी केस दाखवावी. मग त्यांना टार्गेट केलं गेलं असं म्हणता येईल," असं फडणवीस यांनी स्पष्ट केल्ं होतं.

अल्पदरात विक्री झालेल्या राज्यातील सहकारी कारखान्यांबाबत सर्वप्रथम समाजसेवक अण्णा हजारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आवाज उठवला होता. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपने राज्यात सहकारविरोधी भुमिका घेतली अर्थात या प्रयत्नांनी केंद्राची साथ आहे.

रिजर्व बॅंकेचे सहकारावरील अतिरेकी नियंत्रणत तसेच सहकार क्षेत्रातील 54 साखर कारखान्यांची चौकशी करा अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाहांना पत्र लिहून केली आहे. त्यानंतर अनेक कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याची कबुली स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

त्यापैकी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अधिक चर्चेत आला.ईडीच्या अधिकार्‍यांनी कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. हा कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असल्यामुळे हा अजित पवार यांच्यासाठी धक्का होता.

मागील काळात सहकारी बँकिंग (Cooperative Banking) क्षेत्रातील गैर व्यवस्थापनाला आळा बसावा, या बँकांचा कारभार व्यावसायिक दृष्टिकोनातून चालावा आणि ठेवीदार-खातेदारांच्या पैशांचे संरक्षण (Money Security) व्हावे आदी 'उदात्त' हेतूने केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करून सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या संपूर्ण नियंत्रणाखाली आणले. राज्यातील सत्ताकेंद्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती आणि राज्य सहकारी बँकेलाही एक एप्रिलपासून हा कायदा लागू झाला आहे. मुळात या कायद्यातील अनेक तरतुदी या थेट सहकाराला संपवणाऱ्या असल्याने सहकार क्षेत्रातील लोक सांगत आहेत.

'महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांसारखी ठराविक राज्ये वगळता देशात सहकारी चळवळ अपेक्षेप्रमाणे निश्चितच रुजलेली नाही असं सहकार क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यातही महाराष्ट्र सहकार क्षेत्रात अधिक अग्रेसर आहे.महाराष्ट्रात बघितलं तर सहकार मजबूत करण्यात भाजपची भूमिका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत खूपच कमी आहे. गुजरातमधल्या सहकार चळवळीबद्दल बघितलं तर गुजरातमधील सहकार क्षेत्र 2000 सालाच्या आधी विकसित झालं आहे. तेव्हा भाजपचं वर्चस्व गुजरात मध्ये नव्हतं.

जेष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "महाराष्ट्रात साडेचार लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. यातील सर्वाधीक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. जर केंद्र सरकारने सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवले तर त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसणार आहे. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार आहे.

आरोपांनी अस्वस्थ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विक्री झालेल्या सर्व कारखान्यांची नावचं वाचून दाखलली. अजितदादांच्या या उद्वगेवामुळे आता अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. राज्याचे निवृ्त्त अप्पर मु्ख्य सचिव उमेशचंद्र सरंगी म्हणाले, सहकार म्हणजे १०० हत्तीचं बळ. महाराष्ट्राने सहकाराला दिशा दिली. भुतकाळात अनेकांनी त्यासाठी आयुष्य खर्ची केलं. ग्रामीण भागात प्रगतीचं चक्र सुरु झालं. निश्चितपणे मध्यतंरीच्या काळात सहकारी क्षेत्रातील दुष्पप्रवृत्तीमुळं सहकाराला गालबोट लागलं. परंतू सहकारातून समृध्दीकडं जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे सुधारणांसह सहकारानं उभारली घेतली तर निश्चितपणे सहकाराचे गतवैभव प्राप्त होईल.

Updated : 2021-10-23T18:33:52+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top