Home > Max Political > मोदींच्या विकसीत भारत घोषणेला प्रेरित झालो, अन् भाजपात सामील झालो- अशोक चव्हाण

मोदींच्या विकसीत भारत घोषणेला प्रेरित झालो, अन् भाजपात सामील झालो- अशोक चव्हाण

मोदींच्या विकसीत भारत घोषणेला प्रेरित झालो, अन् भाजपात सामील झालो- अशोक चव्हाण
X

नांदेड : भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडला आल्यानंतर नांदेडकरांकडून स्वागत स्वीकारत म्हणाले की, भाजप नेतृत्वाने माझ्यावर विश्र्वास केला आणि महाराष्ट्र, मराठवाडयावर लक्ष केंद्रित करून नांदेडची लोकसभेची जागा निवडून आणण्याची जिम्मेदारी दिली. भाजप नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला खासदारकी दिली,त्याचा मला आनंद झाला, असं चव्हाण यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मी भाजपमध्ये आलो तरी येथे नवीन नाही, यातील जुनी काँग्रेसची टीम ही भाजपात आहे. ज्यांनी कधीकाळी शंकरराव चव्हाण यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम केलं. मी आलो आता काँग्रेस मधील अनेक नेते पदाधिकारी भाजप मध्ये सामील होतील असं विधान त्यांनी यावेळी बोलताना केलं.

Updated : 24 Feb 2024 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top