Home > Max Political > INDIA ची बैठक, जबाबदारी कुणाकडे?

INDIA ची बैठक, जबाबदारी कुणाकडे?

INDIA आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. मात्र या बैठकीची जबाबदारी कुणाकडे? याची माहिती समोर आली आहे.

मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी INDIA आघाडीची तिसरी बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीव या बैठकीची जबाबदारी कुणाकडे? कोण कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे? याविषयीची माहिती समोर आली आहे.

INDIA आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील नामांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये 150 रुम बुक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हॉटेलच्या रूम बुक करणे आणि 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ही ठाकरे गटाकडे असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 31 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले आहे.

काँग्रेसने 1 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जेवणाचे आयोजन केले आहे. त्याबरोबरच या कार्यक्रमाची माध्यमांमध्ये आणि इतर ठिकाणी प्रसिद्धी करण्याची जबाबदारी काँग्रेसकडे असणार आहे.

INDIA आघाडीच्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट वाहनांची व्यवस्था करणार आहे.

बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचे विमानतळावर स्वागत करण्याची जबाबदारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर असणार आहे.

मिलिंद देवरा यांच्यावर सगळ्या पाहुण्यांचे हॉटेलमध्ये स्वागत करण्याची जबाबदारी असणार आहे.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डिनरचे आयोजन करणार आहे.

कोण कधी पोहचणार?

30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता फारूख अब्दुल्ला- T-2

३१ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पार्किंग येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन T2 येथे पोहचणार

मुस्लिम लीगचे एमए कादर यांचे सकाळी 10.05 वा. आगमन

सकाळी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे Gate No.8 येथे पोहचणार आहेत.

दुपारी 12.00 वा. पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचे आगमन

दुपारी 12.55 वा. क्रिष्णा पटेल T1 येथे पोहचणार आहेत.

अखिलेश यादव यांचे गेट नंबर 8 येथे आगमन

दुपारी 4 वाजता T-2 राहुल गांधी आणि सोनिया गांधी पोहचणार आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सायं. 6 वा. आगमन

अरविंद केजरीवाल यांचे सायं. 6 वा. आगमन

ओमर अब्दुल्ला सायं. 6.40 वा. आगमन

Updated : 30 Aug 2023 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top