Home > Max Political > इंडिया आणि भारत:अनिल वैद्य

इंडिया आणि भारत:अनिल वैद्य

Article 1 “India, that is Bharat, shall be a Union of States.”पण आज इंडिया हा शब्द मागासलेले लोक म्हणून ब्रिटिश वापरत होते असा चुकीचा प्रचार केल्या जात आहे.आपली ऐतिासिक विरासत विसरून हे सर्व चालले आहे, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांचा लेख प्रपंच...

इंडिया आणि भारत:अनिल वैद्य
X

सविधानाच्या अनुच्छेद एक मधे देशाचे नाव इंडिया म्हणजे भारत असे नमूद केले आहे.सविधान सभेत 389 विद्वान सदस्य होते.त्यांच्याच दूरदृष्टीने संविधान निर्माण झाले म्हणून जगात लोकशाही प्रधान देश म्हणून भारत देश ओळखला जातो . विद्वान सदस्यांनी इंडिया हा शब्द दिला आहे. ब्रिटिशांनी वाईट अर्थाने वापरला असता तर संविधान समितीने स्वीकारलाच नसता.पण आज इंडिया हा शब्द मागासलेले लोक म्हणून ब्रिटिश वापरत होते असा चुकीचा प्रचार केल्या जात आहे.आपली ऐतिासिक विरासत विसरून हे सर्व चालले आहे.म्हणून हा लेख प्रपंच.

इंडिया नावाच्या मुळाशी जाण्यासाठी सिंधू संस्कृती बाबत थोडक्यात माहिती समजून घेवू .

सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्माण झालेली सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे

सर जॉन मार्शल यांनी याला हडप्पा संस्कृती असे संबोधले. सुमारे २५०० ईसापूर्व, ही सभ्यता त्याच्या शिखरावर पोहोचली. सिंधू संस्कृती ही चीन संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृतीपेक्षा पुढे गेली असे मानले जाते. भारताच्या पुरातत्व विभागाला १९२० मध्ये सिंधू खोऱ्यातील उत्खननादरम्यान मोहेंजोदारो आणि हडप्पा सारखी प्राचीन शहरे सापडली.

ही संस्कृती मूळ निवासी भारतीयांची संस्कृती आहे

हे आधी लक्षात घेणे गजेचे आहे.डाव्या विचारसणीच्या लोकांचे म्हणणे की,

ही संस्कृती मूळ निवासी भारतीयांची आहे. सिंधू नदीच्या काठी असलेल्या

भागाला ब्रिटिश इंडस व्हॅली म्हणत व आजही म्हणतात . इंडस हा लॅटिन शब्द आहे.त्यावरून इंडिया नाव पडले.

भारत नावा बद्दल असे की,

ब्रिटिशांनी या देशावर राज्य केले ,स्वातंत्र्य दिले तेव्हा पासून व त्या पूर्वी पासून अर्थातच पूर्वापार या देशाचे नाव भारत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या 'शूद्र पूर्वी कोण?' या प्रसिद्ध ग्रथात लिहतात की ",देशाला भारत भूमी हे नाव पडले ते वैदिक काळातिल भारत लोकांमुळे.'"

या नावात विशिष्ट धर्म किंवा वंश यांचा देश म्हणून निर्देशित होत नाही

India इंडिया. नाव अरब व युरोपियन लोकांनी सिंधु नदीच्या नावाचा उच्चार इंडस केला व पुढे तो इंडिया India झाला.हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते व युनो मध्येही इंडिया नावाची नोंद आहे.

भारतीय सविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये या देशाला भारत व इंडिया India नाव दिले आहे.हे नाव ठरविताना संविधान सभेत चर्चा झाली पण इंडिया व भारत नावाला कुणीही विरोध केला नाही. हिंदुस्थान नावा साठी आग्रह धरला नाही. या बाबत संविधान सभेत झालेल्या चर्चेचा मागोवा घेऊ तो असा.

सविधान सभेत दिनांक15 नोव्हेंबर 1948 ला चर्चा झाली. सविधान सभेच्या विविध सदस्यांनी देशाला कोणते नाव दयावे या बाबत प्रस्ताव मांडले,मौलाना हसरत मोहिनी यांनी 'सार्वभौम स्वतन्त्र गणराज्य किंवा "सार्वभौम लोकशाही गणराज्य "असे

वाक्य देशाच्या नावाला जोडण्याची सूचना केली. एम नंतश्ययम आयांगर (मद्रास) यांनी भारत वर्ष आणि हिंदुस्थान हे नाव देण्यासाठी विचार करावा. प्रो के टी शाह(बिहार) म्हणाले धर्मनिरपेक्ष, संघीय समाजवादी असे शब्द देशाच्या नावाला जोडा.प्रो शिवनलाल सक्षेना यांनी देशाचे नाव भारत असावे असा प्रस्ताव मांडला.

सर्व प्रस्ताव ऐकल्यावर मसुदा समिती चे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडले ते असे

"महोदय, मी या सर्वच संशोधनांचा विरोध करतो, जो पर्यंत प्रथम संशोधनाचा संबंध आहे, त्याचा उद्देश असा आहे की भारताला" संयुक्त राज्य भारत"

म्हणण्यात यावे. माझे मित्र श्री. कामत जे बोलले ते तर्क संगत आहे, आणि मी त्यांचा सहर्ष स्वीकार करतो. मी 'Union (संघ)' शब्दाचा प्रयोग का केला आहे आणि 'Federation (संघीय) शब्द का सोडून दिला या संबंधात आपले विचार व्यक्त केले आहेत.

दुसऱ्या संशोधना संबंधात ज्याचा उद्देश असा आहे की "India"इंडिया (भारत) ला "Union of india" इंडिया (भारताचा संघ) म्हणण्यात यावे, मी पून्हा म्हणतो की ,हे अनावश्यक आहे. कारण सदा आमचा उद्देश असाच राहीला आहे की या देशाला "India"इंडिया (भारत) म्हणण्यात यावे. आणि त्याच्या नावातुन आम्ही हे प्रकट होऊ दिले नाही की संघांच्या अगांचा संघाशी अशा प्रकारचा संबंध आहे. गत अनेक वर्षापासून इतिहासात हा देश "India"इंडिया (भारत) याच नावाने ओळखला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य म्हणून याला इंडिया "India"(भारत) म्हणूनच ओळखला जाते आणि सर्वच करारांवर याच नावाने हस्ताक्षर केले जाते. माझ्या विचाराचे देशाच्या नावात या संकेत नसावा की त्याचे अंग कोणत्या प्रकारचे आहेत. म्हणून मी या संशोधनांचा विरोध केला आणि याची पुष्टी करतो की जेथपर्यंत या संशोधनांचा संबंध आहे, संविधानाच्या मसुद्यात अशा प्रकारची प्रावधाने आहेत, ती एकदम उचित आहेत."

सविधान सभेतील देशाच्या नावा बाबतीत झालेली चर्चा वाचली तर भारत व इंडिया नावाला कोणत्याही सदस्यांनी विरोध केला नाही की हिंदुस्थान नाव असा आग्रह धरला नाही.कुणी म्हटले समाजवादी भारत म्हणा तर कुणी म्हणाले सार्वभौम भारत म्हणा एव्हडेच.

इंडिका ग्रंथ लीहणारा

मेगास्थेनिस हा एक ग्रीक इतिहासकार आणि मुत्सद्दी होता ( इ.स.पू.च्या चौथ्या आणि तिसर्‍या शतकात) मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्राचीन भारतातील प्रवास आणि निरीक्षणे यांचे तपशीलवार वर्णन असलेला "इंडिका"हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती, समाज आणि भूगोल याविषयी माहिती देणारा मेगॅस्थेनिसचा ‘इंडिका’ हा महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.इंडिका ग्रंथ इंडस व्हॅलीत राहणाऱ्या लोकांची म्हंनजे सिंधू नदी व संस्कृतीच्या लोकांची माहिती देतो . इंडिका वरून इंडिया झाले आहे.देशाचे नाव इंडिया शब्दालाही ऐतिहसिक महत्त्व आहे.हे लक्षात घेतले पाहिेजे. इंडिया या नावात सिंधू संस्कृतीचा अभिमान दडलेला आहे. तेव्हा भारत व इंडिया दोन्हींचे महत्व सारखे आहे.

खरे तर ग्रीकांनी इंडिया नाव दिले .त्यांनी

सिंधू नदीच्या खोऱ्यात

राहणाऱ्या लोकांचे नामकरण केले "इंडोई (इंडस नदीच्या खोर्यातील लोक)" आणि म्हणून या हरप्पा संस्कृतीला नाव पडले "इंडस सिव्हिलायझेशन".त्यावरूनच इंडिया झाले.ब्रिटिशांनी हिणकसपणें इंडिया नाव दिले हे म्हणणे बरोबर नाही.

संदर्भ असे आहेत की,

24 ऑगस्ट 1608 ला इंग्रज भारतामध्ये सर्वप्रथम आले… ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये मसाल्यांचे व्यापारी म्हणून भारतात आली.परंतु मेगास्थिस या ग्रीक इतिहासारांनी इंडिका हा ग्रंथ ई सन पूर्व 4 आणि 3 ऱ्या शतकात लिहला.

त्या मुळे ब्रिटिशांनी इंडिया नाव दिले हे कसे काय म्हणता ? ब्रिटिशांनी शेकडो देशावर राज्य केलें त्या देशाचे नाव त्यांनी बदलले नाही.मग याच देशाचे का बदलतील? भारत देशाला इंडस व्हॅली वरून

पूर्वापार इंडिया म्हणतात म्हणून या देशाची जगात इंडिया म्हणून ओळख आहे.सिंधूनदीच्याखोरयात समृध्द संस्कृती होती म्हणून इंडिया ही मूळ निवासी भारतीयांची

ऐतिासिक ओळख आहे.

- माजी न्यायमुर्ती अनिल वैद्य

Updated : 13 Sep 2023 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top