Home > Max Political > इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवर खोचक शब्दात टिका; काय म्हणाले ? वाचा

इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवर खोचक शब्दात टिका; काय म्हणाले ? वाचा

इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवर खोचक शब्दात टिका; काय म्हणाले ? वाचा
X

खासदार नवनीत राणा यांनी स्वतःप्रमाणे मलाही बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावं, त्यानंतर मी अमरावती मतदारसंघातून त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे असा खोचक टोला एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. भ्रष्टाचारामुळे भाजपात प्रवेश करावा किंवा कारागृहात जावं, या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकारण हे वाईट पातळीवर जाऊन पोहोतलंय असं इम्तियाज जलील म्हणाले.

लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत राज्याच्या राजकारणात बरंच काही घडणार आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेकजण येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील त्यांनी सांगितलंय.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ?

खासदार नवनीत राणा या इम्तियाज जलील यांना म्हणाल्या की, "जर तुझ्यात हिंमत असेल तर अमरावतीत येऊन निवडणूक लढवून मला हरवून दाखव, आणि जर नाही लढला, तर तुझ्या संभाजीनगर मध्ये येऊन बघेन की यावेळेस तू कसा निवडून येशील. आणि संभाजीनगर मधील लोक यावेळच्या निवडणूकीत छत्रपती संभाजी महाराजांना दाग नाही लागू देणार आणि अशा लोकांना तिथून निवडून नाही येऊ देणार". नवनीत राणांनी अशा शब्दात टीका केली होती.

Updated : 25 Feb 2024 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top