Top
Home > Max Political > ममता दीदींना पराभूत करणे अशक्य – संजय राऊत

ममता दीदींना पराभूत करणे अशक्य – संजय राऊत

ममता दीदींना पराभूत करणे अशक्य – संजय राऊत
X

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सत्तेकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. यावर आता शिवसेनेतर्फे पहिल्यांदा भाष्य करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीच येणार, ममता दीदीना हरवणं शक्य नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने केलेल्या मेहनतीची कोतुक केले पाहिजे, या संकट काळात मोदी आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री तिथे बसले होते, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. पुद्दूचेरी आणि तामिळनाडू सोडून कुठेही परिवर्तन होणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत फटका बसू नये यासाठी शिवसेनेने प.बंगालमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केली होती.

Updated : 2 May 2021 4:45 AM GMT
Next Story
Share it
Top