Home > Max Political > देवेंद्र फडणवीस मध्ये जराही नैतिकता उरली असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस मध्ये जराही नैतिकता उरली असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस मध्ये जराही नैतिकता उरली असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे
X

सत्तेचा कैफ आणि सत्तेच्या नशेची झापड देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर चढलीय, तुम्ही जर महाराष्ट्रात 45 पार असाल तर एका पत्रकाराला का घाबरता ? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जराही नैतिकता उरली असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा..अशी मागणी देखील त्यांनी टीका करत केलीय.

यावेळी त्या म्हणाल्या, की हे व्हरीबल आहे, लोकांना आता कायद्याचा धाक उरला नाही. एकाच आठवड्यात तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांसमोर आणि पोलीस ठाण्यात गोळीबार होतो, याचा अर्थ लोकांना आता पोलिसांचा धाकच राहिला नाही..

जे गृहमंत्री अत्यंत संवेदनशील पणे सांगतात की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा मागताल, कदाचित या गृहमंत्र्यांना माणसांमधील आणि जनावरांमधील फरक कळत नाही.. सत्तेचा कैफ आणि सत्तेची नशा कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांवर चढली आहे. जर तुम्ही तिकडे सांगत असाल मोदी की गॅरंटी आहे और चारसो पार है.. मोदी की गॅरंटी और 45 पार है... तर तुमची 45 पार असतील तर एका पत्रकाराला तुम्ही घाबरता कशाला ? एका पत्रकारासाठी तुम्हाला इतकी भीती का वाटते ? धीरज घाटे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले असताना तुम्ही वागळेंना संरक्षण का दिलं नाही ? त्यामुळे जर तुमच्यात जराही नैतिकता उरली असेल तर तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका करत मागणी देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केलीय.

Updated : 11 Feb 2024 5:02 PM IST
Next Story
Share it
Top