Home > Max Political > मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहणार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली इच्छा

मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहणार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली इच्छा

मोदींनी काश्मीर फाईल्सप्रमाणे गुजरात फाईल्सही चित्रपट बनवा अशी सुशीलकुमार शिंदे यांनी मागणी केली आहे.

मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहणार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली इच्छा
X

गेल्या अनेक दिवसांपासून विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी दिग्दर्शित केलेला द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तर या चित्रपटावरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला असतानाच मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहणार असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ( Sushil kumar shinde criticize to Modi government on Kashmir files film)

काश्मीर फाईल्स चित्रपटावरून देशात चर्चाला उधाण आले आहे. या चित्रपटात काश्मीरी हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत. त्यातच या चित्रपटाने कोट्यावधींचा गल्ला जमवला आहे. तर भाजप नेते आपल्या राजकीय फायद्यासाठी या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातच काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला नाही मात्र मी हा चित्रपट पाहणार असल्याचे मत पुणे येथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना व्यक्त केले. ( I will see Kashmir Files film)

गुजरात फाईल्सवरही चित्रपट बनवा

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काश्मीर फाईल्समधून काश्मीरी पंडितांच्या व्यथा दाखवण्यात आले. त्याचे मोदींनी कौतूक केले ते ठीक आहे. पण एका राणा नावाच्या लेखिकेने गुजरात फाईल्सवर फार चांगले लेखन केले आहे. त्यावर चित्रपट बनवून त्याचीही मोदी यांनी प्रसिध्दी करावी. त्यामुळे या दोन्ही विषयांवर बॅलन्स करता येईल, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

Updated : 12 April 2022 4:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top