Home > Max Political > मी निवृत्ती घेतली आहे, प्रणिती शिंदेच काँग्रेस उमेदवार - सुशीलकुमार शिंदे

मी निवृत्ती घेतली आहे, प्रणिती शिंदेच काँग्रेस उमेदवार - सुशीलकुमार शिंदे

मी निवृत्ती घेतली आहे, प्रणिती शिंदेच काँग्रेस उमेदवार - सुशीलकुमार शिंदे
X

सोलापूर - कॉग्रेसचे जेष्ठनेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा विषयी भाष्य केले आहे. मी निवृत्ती जाहीर केलीये, त्यामुळे प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कॉग्रेस जेष्ट नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सोलापूर येतील डॉ बाबासाहेबाच्या स्मारकाला भेट दिली. ते म्हणाले कि, दरवर्षी आम्ही जयंती आणि महनिर्माण दिनानिमित्त बाबासाहेबाना अभिवादन करतो. योगायोगाने आज मी सोलापुरात आहे. सुशील कुमार शिंदे म्हणाले कि, बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारण देखील करा येत नाही.

दरम्यान या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विषयी देखील भाष्य केले. मी राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे ह्याच काँग्रेसच्या उमेदवार असतील. मला जे करता येईल ती मदत मी करणार असल्याचे ते म्हणाले

Updated : 24 Oct 2023 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top