Home > Max Political > वाढत्या महागाई विरोधात कॉंग्रेसची दिल्लीत महारॅली, कसं आहे रॅलीचं नियोजन?

वाढत्या महागाई विरोधात कॉंग्रेसची दिल्लीत महारॅली, कसं आहे रॅलीचं नियोजन?

देशातील वाढत्या महागाई विरोधात आज राजधानी दिल्ली येथे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं आहे.कॉंग्रेसच्या या महारॅलीला देशभरातील कॉंग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.

वाढत्या महागाई विरोधात कॉंग्रेसची दिल्लीत महारॅली, कसं आहे रॅलीचं नियोजन?
X

देशातील वाढत्या महागाई विरोधात आज राजधानी दिल्ली येथे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं आहे.कॉंग्रेसच्या या महारॅलीला देशभरातील कॉंग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.

या अगोदर संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना ५ ऑगस्टला कॉंग्रेसने महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले होते.

आजच्या दिल्लीतील कॉंग्रेसच्या महारॅलीला महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसचे बडे नेते आजच्या रॅलीला उपस्थित राहतील.

कसे असेल कॉंग्रेसच्या रॅलीचं नियोजन?

रामलीला मैदानावर तीन स्टेज करण्यात आले आहेत. मध्यभागी असलेल्या स्टेजवर कॉंग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहतील, तर दोन्ही बाजूला लागलेल्या इतर दोन स्टेजवर राज्यस्तरीय नेत्यांना स्थान देण्यात येणार आहे.स्टेज च्या अगदी समोर कॉंग्रेसच्या राज्यस्तरावरील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक राज्यातून १० ते १५ हजार कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.

कडक सुरक्षा व्यवस्था

कॉंग्रेस च्या रॅलीला राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Updated : 4 Sep 2022 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top