Home > Max Political > महायुतीकडून संभाजीनगरमध्ये उमेदवार नसल्यामुळे घोडे अडले....! काय कारण आहे, वाचा

महायुतीकडून संभाजीनगरमध्ये उमेदवार नसल्यामुळे घोडे अडले....! काय कारण आहे, वाचा

महायुतीकडून संभाजीनगरमध्ये उमेदवार नसल्यामुळे घोडे अडले....! काय कारण आहे, वाचा
X

लोकसभा निवडणूकीच्या राज्यात रणधुमाळी सुरु असतानाच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात या वेळी विविधांगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी एका बाजूला महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे तर एमाआयएमकडून उमेदवार विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खाँन या नावाचा नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. अशी परिस्थिती असताना महायुतीकडून अद्यात संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता खासदार इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांना टक्कर देणारा उमेदवार महायुतीकडे आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचं नाव सर्वात पुढे आहे. लोकसभा निवडणूकीत उमेदवारी मिळावी यासाठी भागवत कराड सातत्याने प्रयत्न करत असताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेची भेट घेतली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील संभाजीनगरच्या जागेवर दावा केला आहे. उमेदवारीसाठी संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांचं नाव पुढे केलं आहे. त्याचबरोबर संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. मात्र चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार अद्याप महायुतीला सापडलेला नाही, असंही म्हटलं जात आहे.

Updated : 13 April 2024 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top