Home > Max Political > हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट, तर बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी जाहीर.

हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट, तर बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी जाहीर.

हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट, तर बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी जाहीर.
X

शिवसेनेच्या शिंदे गटावर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अखेर बदल्याची नामुष्की ओढवली असून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे. आता हदगाव तालुक्यातील कोहळी येथील बाबुराव उर्फ संभाराव गुणाजी कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हदगाव विधानसभा निवडणूकीत त्यांनी दोन्ही वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

बाबुराव कदम यांनी १९८७ पासून आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या कोहळी या गावातील विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्थेचे संचालक पद भुषविले आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूकीत सन २००० मध्ये सरपंच झाले. नांदेड जिल्ह्यातील निवघा-तळणी जिल्हा परिषद गटातून ते सब २००२ मध्ये विजयी झाले. त्याचबरोबर २०१२ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील पाहिले.

Updated : 3 April 2024 2:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top