Home > Max Political > Friendship Day : राजकारणातील दोस्ती पाहून लोकं म्हणाली, "ओ... शेठ तुम्ही नादच केलाय थेट"

Friendship Day : राजकारणातील दोस्ती पाहून लोकं म्हणाली, "ओ... शेठ तुम्ही नादच केलाय थेट"

Friendship Day : राजकारणातील दोस्ती पाहून लोकं म्हणाली, ओ... शेठ तुम्ही नादच केलाय थेट
X

राजकारणात कोणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो असे म्हटले जाते. प्रसंगानुरूप अनेक जण आपला चेहरा बदलतात. मात्र, राजकारणातील जिवलग जोडी म्हणून परिचीत असलेले एक सिल्लोडचे सत्तार शेट अणि दूसरे वैजापुरचे अकील शेट यांनी चढा-ओढीच्या काळात ही आपला दोस्ताना कायम ठेवलेला आहे. त्यामुळेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) मंत्री झाल्यानंतरही वैजापुरचे जीवलग मित्र माजी उप नगराध्यक्ष हाजी अकील शेट यांच्या घरी जेवण करण्याचे विसरले नाही. विश्‍वासाचे नाते जपणाऱ्या राजकीय मैत्रीची सोशल मिडियावर ओ...शेठ तुम्ही नादच केलाय थेट अशी चर्चा रंगल्याचे दिसले. विशेष म्हणजे आज मैत्री ( International Friendship Day) दिनानिमित्ताने ही चर्चा अधिकीच पाहायला मिळाली.

अब्दुल सत्तार (abdul sattar) आज मंत्री जरी झाले असले तरी पहिल्या पासून तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यासोबत त्यांचे घनिष्ट संबध आहे. विशेषकरुण भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपनगराध्यक्ष साबेर खान व माजी उप नगराध्यक्ष हाजी अकील सेठ हे ३५ वर्षांच्या नगर पालिकेच्या राजकारणातील जिवलग जोडी समजली जाते. आज हे सर्व मित्र वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची दोस्ती कायम आहे.

विशेष करुण सत्तार ज्यावेळेस वैजापुरात येतात त्यावेळी हे सर्व मित्र एकत्र जमले नाही व अकील शेट यांच्या घरी सर्व सोबत जेवले नाही असे कधीच होत नाही. सत्तार हे पंचायत समितीच्या सभापती सिना मनाजी मिसाळ यांच्या मुलीच्या साखरपुढा निमित्त वैजापुरला आले होते. हे कार्यक्रम झाल्यानंतर सत्तार यांनी जुने मित्रांची भेट घेवून संपूर्ण ताफा बाजारतळा जवळ असलेल्या अकील शेट यांच्या घरी थांबवून सत्तार यांनी जुन्या मित्रा सोबत जेवण घेण्याची परंपरा कायम ठेवल्याने वैजापुर येथे ओ... शेठ तुम्ही नादच केलाय थेट याबाबत चर्चेला चांगलेच उधाण आले होते.

Updated : 1 Aug 2021 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top