Home > Max Political > कॉंग्रेसला मोठा झटका, प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल कॉंग्रेस मध्ये

कॉंग्रेसला मोठा झटका, प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल कॉंग्रेस मध्ये

कॉंग्रेसला मोठा झटका, प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल कॉंग्रेस मध्ये
X

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस मध्ये Incoming सुरु आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र, तृणमूल कॉंग्रेसने आता कॉंग्रेसला देखील धक्का दिला आहे. भारत चे माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेस चे दिग्गज दिवंगत नेते प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी आज (सोमवार) ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. अभिजीत यांनी कोलकाता येथे पार्टीचं सदस्यत्व स्विकारलं.

Updated : 5 July 2021 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top