भाजपवर बरसले माजी मंत्री रामदास कदम..! काय म्हणाले? वाचा
X
लोकसभा निवडणूकीच्या जागेवरून कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना-भाजपमध्ये दावे प्रतिदावे सूरू आहेत. महायुतीमधील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही रायगडावर पण सांगाल, की रत्नगिरीमध्ये पण आम्हीच ! पण असं होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच निवडून यायचं आहे का ? अशा शब्दात भाजपवर रामदास कदम बरसले.
रत्नागिरी आणि रायगड लोकसभावर तुम्ही सांगाल की, आमचंच वर्चस्व असेल तर असं होत नाही. रत्नागिरीची जी जागा आहे ती शिवसेनेची आहे. तुम्हाला भाजपला सर्व पक्षांना संपवून एकट्याला जिवंत रहायचं आहे का? असा सवाल उपस्थित करून शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर टिका केली आहे. आम्ही दोघे भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ, आणि माझ्याला हात लका लावू, असं होता कामा नये, असा टोला देखील रामदास कदमांनी भाजपाला लगावला आहे.