Home > News Update > जालना जिल्ह्यात बसचा भीषण अपघात

जालना जिल्ह्यात बसचा भीषण अपघात

जालना जिल्ह्यात बसचा भीषण अपघात
X

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अख्खी बसच पुलाखाली कोसळलीय. पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा मंठा ते जालना रोडवर अपघात झालाय. मंठा जवळील केंधळी येथील ब्रिजखाली ही बस पडलीय. या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरु आहे. याच ठिकाणी ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली गेली आहे. या बसमध्ये 42 प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवहानी झाली नसल्याची माहिती आहे. या बस अपघातातील रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated : 10 Aug 2023 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top