Home > Max Political > संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं सणसणीत प्रतिउत्तर...! काय म्हणाले? वाचा

संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं सणसणीत प्रतिउत्तर...! काय म्हणाले? वाचा

संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं सणसणीत प्रतिउत्तर...! काय म्हणाले? वाचा
X

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपने आमदार खासदार खरेदीचा नवा धंदा सुरू केलाय. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणसणीत उत्तर देत, कोण संजय राऊत? तुम्ही माझा स्तर पाहून तर प्रश्न विचारा? असा टोला लगावला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. राहूल गांधी यांना निवडणूक येणार नसल्याचे माहिती आहे, त्यामुळे ते प्रत्येकाला ताजमहल बांधून देण्याचेही आश्वासन देतील. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहेत. काँग्रेसने ओबीसी समाजाचा वापर केवळ वोट बँक म्हणून केला असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

दरवर्षी आपण एमएसपी वाढ करत आहोत. मात्र, असं करताना सर्वांना मोफत अन्नधान्य वितरण केले जात आहे. भारताच्या रक्तातच लोकशाही आहे. वास्तविक भारतातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या विरोधातील लाखो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दोन वर्षे जेल मध्ये ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर या लोकशाहीचे मोठे पुरस्कर्ते आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Updated : 15 April 2024 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top