Home > Max Political > नवाब मलिकांच्या विरोधात फडणवीस यांच पवारांना पत्र

नवाब मलिकांच्या विरोधात फडणवीस यांच पवारांना पत्र

नवाब मलिकांच्या विरोधात फडणवीस यांच पवारांना पत्र
X

देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला महायुतीमध्ये घेऊ नये. अशा आशयाचे पत्र अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवल आहे.

नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. यावरून ते अजित पवार गटासोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. मात्र मलिकांवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी मलिकांवर टीका करत तोंड सुख घेतले होते. आता मलिकच सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे.

यामुळे मलिक यांच्यावर आरोप सिद्ध होई पर्यंत महायुतीत स्थान देऊ नये अशा आशयाचे पत्र थेट फडणवीस यांनी अजित पवारांना फडणवीस यांच्या लेटर हेड वरून पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याने या पत्राची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे.

Updated : 10 Dec 2023 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top