Home > Max Political > परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे: नाना पटोले

परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे: नाना पटोले

अधिकाऱ्यांचा वापर करुन सरकार पाडण्याचा भाजपनं प्रयत्न करु नये. कॉंग्रेसचा वाटा विचारणाऱ्यांनी हे लक्षात घ्या या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं.परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज केला.

परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे: नाना पटोले
X

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती. राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसंच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर देत, "या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं.

"वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे, असे पटोले म्हणाले.

परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती," असं नाना पटोले यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचीत भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

"वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत.

जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं," असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून राजभवन भाजपा कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नाही," असं नाना पटोले यांनी म्हटलं.

Updated : 24 March 2021 10:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top