Home > Max Political > सभेत घुसुन दाखवा, 51 हजारांच बक्षीस मिळवा.गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांचे आव्हान.

सभेत घुसुन दाखवा, 51 हजारांच बक्षीस मिळवा.गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांचे आव्हान.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथ उद्धव ठाकरे यांची रविवारी सभा आहे.पण या सभेआधीच वातावरण टाईट झाले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी चांगलं बोलावं आमच्यावर आरोप करू नये अन्यथा स्वतः अथवा शिवसैनिक ठाकरेंच्या सभेत घुसतील असा इशारा दिला होता.

सभेत घुसुन दाखवा, 51 हजारांच बक्षीस मिळवा.गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांचे आव्हान.
X

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथ उद्धव ठाकरे यांची रविवारी सभा आहे.पण या सभेआधीच वातावरण टाईट झाले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी चांगलं बोलावं आमच्यावर आरोप करू नये अन्यथा स्वतः अथवा शिवसैनिक ठाकरेंच्या सभेत घुसतील असा इशारा दिला होता. यावर संजय राऊत(sanjay raut) यांनीही गुलाबराव पाटील (Gulabarao Patil )यांच आव्हान स्वीकारत सभेत घुसून दाखवा बाहेर कसे येतात ते पाहू असा प्रति इशारा दिला होता. त्यावर आता स्थानिक शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांनी ठाकरेंच्या सभेत घुसून दाखवल्यास 51 हजारांच बक्षीस देउ असे प्रतिआव्हान दिले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने आले आहे. पाचोरा येथे रविवारी होणाऱ्या सभेत ठाकरे शिंदे गटाच्या वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त केला आहे.

जळगाव (jalgoan)जिल्ह्यातील शिवसेनेचे गुलाबराव पाटलांसह पाचही आमदार शिंदे गटात सामील झाले होते. शिवसेनेच्या मोठया बंडा नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा जळगाव दौरा आहे .ठाकरे (uddhav thakare)कोणावर तोंडसुख घेतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.

Updated : 21 April 2023 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top