Home > Max Political > राष्ट्रवादी निवडणूक आयोगाच्या कचाट्यात

राष्ट्रवादी निवडणूक आयोगाच्या कचाट्यात

शिवसेनेपाठोपाठ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडला आहे.

राष्ट्रवादी निवडणूक आयोगाच्या कचाट्यात
X

गेल्या आठ महिन्यांपासून शिवसेना (Shivsena) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. त्यावर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापाठोपाठ आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही नोटीस पाठवली आहे. (Election commission issue notice to NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा फेरविचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये नियमानुसार ज्या अटींची पुर्तता करावी लागते, त्याची निवडणूक आयोग समीक्षा करत असतो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप आणि बसपा या पक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी (NCP), भाकप (BKP)आणि बसपाच्या (BSP) दर्जाविषयी फेरविचार सुरु झाला. मात्र निवडणूक आयोगाने ही प्रक्रीया पाच वर्षासाठी पुढे ढकलली होती. त्यानंतर 2019 मध्ये निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी, बसपा आणि भाकप हे पक्ष अटींची पुर्तता करतात का? याची समीक्षा सुरु केली. त्यावेळी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकही तोंडावर आल्याने निवडणूक आयोगाने ही सुनावणी लांबणीवर टाकली होती. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, भाकप आणि बसपाला नोटीस पाठवली आहे. त्यानुसार मंगळवारी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Prafulla patel) यांच्यासह त्यांचे वकील सुनावणीला हजर असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या निकालापाठोपाठ राष्ट्रवादीला नोटीस आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत काय आहे निकष? (Rules for national party in india)

कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवायचा असेल तर त्यांना काही अटी शर्तींचे पालन करावे लागते.

1) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष (Regional party) म्हणून मान्यता आवश्यक असते.

2) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणूकीत संबधित पक्षाला दोन टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक असते.

3) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यामध्ये लोकसभेच्या (Loksabha Election) चार जागा आणि 6 टक्के मतांची आवश्यकता असते.

4) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणूकीत दोन टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक असते.

5) विधानसभा निवडणूकीत किमान सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवणे आवश्यक

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतच्या अटींमधील कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा देण्यात येतो.

शिवसेनेतील संघर्षाच्या निकालापाठोपाठ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस पाठवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडला आहे.

Updated : 22 March 2023 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top