Home > Max Political > Eknath Shinde | पंतप्रधान मोदींचा जन्म राष्ट्रनिर्मितीसाठी झालाय - मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde | पंतप्रधान मोदींचा जन्म राष्ट्रनिर्मितीसाठी झालाय - मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde | पंतप्रधान मोदींचा जन्म राष्ट्रनिर्मितीसाठी झालाय - मुख्यमंत्री शिंदे
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम काँग्रेसने ५० ते ६० वर्षात केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनिर्मीतीसाठी झाला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षावर घणाघाती हल्ला

यावेली बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पिडीत आहे. मोदींना हपवायचे असा त्यांचा 'पण' आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांची यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकडे ना बॉल आहेत ना बॅट्समॅन आहेत, जे आहेत ते सगळे खेळाडूच आहेत.मागील १० वर्षात आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला आता पुढची पाच पर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकार षटकार मारून विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली.

Updated : 17 April 2024 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top