Home > Max Political > एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...
X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष होत.बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं. राज्यपालनी बहुमत चाचणी देण्याचे निर्देश ठाकरे सरकारला दिले होते . त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आज सकाळी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले.मुंबईत येताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .

आज सकाळपासूनच राज्यात कोण मुख्यमंत्री होणार याकडे लक्ष लागून होत ,साहजिकच भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असा मानस सर्वांचा होता पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील ,अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे या आठवडाभर चाललेल्या सत्तानाट्याला एक वेगळं वळण लागलं आहे. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून मनाचा मोठेपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखविल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे.आता 'मी पुन्हा येईन' या वाक्याला फडणवीसांनी नवं वळण दिले आहे. शिंदे गटाने भाजपला पाठिंबा देत नवीन सरकार स्थापन केलं आहे .त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, "आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल," असं फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, "मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. "या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल," असं फडणवीस म्हणाले.


एकनाथ शिंदे म्हणाले, "भाजपाकडे १२० चं संख्याबळ आहे. असं असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते तुमच्यासमोर होतं." असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत राहायला आम्ही तयार नाही. उद्धवजींनी आमदारांऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य दिलं त्यांची कास धरुन ठेवली. आज हे सरकार गेलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राला पर्यायी सरकार देणार आहोत. आधी विचारलं जायचं तेव्हा सांगितलेलं की पर्यायी सरकार देऊ निवडणुका लागणार नाही." असंही फडणवीस म्हणाले आहेत.

"भाजपा आणि शिवसेनेचा विधीमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि इतर आमदार सोबत आलेले आहेत. या सगळ्यांचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलंय. भाजपाने हा निर्णय केला आम्ही सत्तेच्या मागे नाही. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी काम करत नाही ही तत्वांची, हिंदुत्वाची लढाई आहे," असं फडणवीसांनी म्हटलं आहे.



Updated : 30 Jun 2022 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top