Top
Home > Max Political > Video: राष्ट्रवादी सोडणार का? खडसे म्हणाले...

Video: राष्ट्रवादी सोडणार का? खडसे म्हणाले...

Video: राष्ट्रवादी सोडणार का? खडसे म्हणाले...
X

गेल्या काही दिवसात राज्यात होणाऱ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट खडसेंच्या घरी चहा पाण्याला जाणं... आणि खडसेंनी इकडे मुंबईत शरद पवार यांची भेट घेणं. यामुळं राज्यात राजकारण तापलं आहे. या सर्व राजकीय वर्तुळातील चक्रावर आज एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं.

यावेळी त्यांना खडसे राष्ट्रवादी सोडणार का? असा सवाल केला असता, खडसे यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करणार नाही. राष्ट्रवादीत आल्यानंतर मला मानसिक आधार मिळाला. माझ्या वर ED सारख्या ज्या चौकश्या सुरू आहेत. त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळाली. भाजपने माझा छळ केला म्हणूनच मी भाजपला सोडून राष्ट्रवादीत गेलो.

गुलाबराव पाटलांना टोला

माझ्यापेक्षा गुलाबराव पाटलांना ज्ञान अधिक आहे. त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही सिरीयसली बघत नाहीत.

Updated : 4 Jun 2021 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top