माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आगमनामुळे नांदेड शहर जाम,स्वागतासाठी उसळली अलोट गर्दी.
जिल्हाभरात शुभेच्छा व अभिनंदनाची बॅनरबाजी,तर हजारो किलो वाजनांच्या फुलांचे हार क्रेनला लावून स्वागत. अशोक चव्हाणांच्या समर्थकांची शक्ती प्रदर्शन करत विमानतळा बाहेर आलोट गर्दी, विमानतळ परिसरात वाहनांच्या दुतर्फा रांगा.
X
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण हे नांदेडात दाखल होत आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या आगमनानिमीत्त शुभेच्छांचे बॅनर शहर आणि जिल्हाभरात झळकताना पाहायला मिळाले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अगमनानिमीत्त शहरात आणि जिल्हाभरात शुभेच्छा व अभिनंदनाची बॅनरबाजी कऱण्यात आलीय.तर अशोक चव्हाणांच्या समर्थकांची शक्ती प्रदर्शन करत विमानतळाबाहेर आलोट गर्दी केली असुन विमानतळ परिसरात वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा लावण्यात आल्या होत्या.
तर नांदेड शहरात जागोजाग स्वागताचे स्टॉल हारतुरे घेऊन हजारो चव्हाण समर्थकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.तर शहरांतील प्रमुख चौकात अशोक चाव्हणांच्या स्वागतासाठी हजारो कीलोंच्या वजनाचे फुलांचे पुष्पहार क्रेनला लावून आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी नांदेडकरांनी अक्षशः गर्दी केली होती. दरम्यान चव्हणांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे नांदेड शहर मात्र काही काळ जाम झाले होते.