Home > Max Political > Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | पाठीत घुसवलेली कट्यार गेली कुठे- फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | पाठीत घुसवलेली कट्यार गेली कुठे- फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | पाठीत घुसवलेली कट्यार गेली कुठे- फडणवीसांचा ठाकरेंना टोला
X

२०१९ मध्ये 'कट्यार पाठीत घुसली' हा प्रयोग झाला. त्या नंतर कट्यार 'आता होती, गेली कुठे?' हा प्रयोग २०२२ मध्ये आम्ही केला,असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला. याच बरोबर मिश्किल भाष्य करत असताना आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना मानेचा पट्टा वापरण्याची गरज भासत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांचं नाव घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला देखील लगावला.

पुणे पिंपरी चिंचवड येथे होत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. नाट्य संमेलनाच्या हस्तांतर सोहळ्याचे आयोजन काल करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत असताना नाट्य संमेलनाच्या माध्यमातून राजकीय फटकेबाजी केली.

Updated : 8 Jan 2024 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top