Home > Max Political > देगलूर बिलोली पोटनिवडणूक: कॉंग्रेसला झटका, भीमराव क्षीरसागर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश

देगलूर बिलोली पोटनिवडणूक: कॉंग्रेसला झटका, भीमराव क्षीरसागर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश

देगलूर बिलोली पोटनिवडणूक: कॉंग्रेसला झटका, भीमराव क्षीरसागर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश
X

काँग्रेस ने उमेदवारी नाकारलेल्या प्रसिद्ध व्यावसायिक भीमराव क्षीरसागर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

'मीच काँग्रेसचा अधिकृत उमेदवार' म्हणून गावोगावी भेट देणारे भीमराव क्षीरसागर यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो.

या भागात बौद्ध समाजाची संख्या अधिक असल्याने कॉंग्रेसला हा मोठा फटका समजला जात आहे. देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत मंगेश कदम, भीमराव क्षीरसागर हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने भीमराव क्षीरसागर यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

2014 ला ते देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा क्षीरसागर यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपचं कमळ हातात घेतलं आहे.

दरम्यान भाजपकडून इच्छुक असलेले प्रा. उत्तम कुमार सोनकांबळे यांना भाजपा ने तिकीट नाकारून सुभाष साबणे यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस ने जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी दिली.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

Updated : 25 Oct 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top