Home > Max Political > लाड कुणाचे केले आणि प्रसाद कुणाला दिला? अजित पवारांची राजकीय टोलेबाजी

लाड कुणाचे केले आणि प्रसाद कुणाला दिला? अजित पवारांची राजकीय टोलेबाजी

लाड कुणाचे केले आणि प्रसाद कुणाला दिला? अजित पवारांची राजकीय टोलेबाजी
X

येत्या जुलै मध्ये विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आज सदस्यांचा निरोप समारंभ झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफानी राजकीय टोलेबाजी केली.

जुलै महिन्यात विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आज विधान परिषदेत या सदस्यांचा निरोप समारंभ झाला. अजित पवार यांनी सभापती यांच्या आमदारांच्या निरोप समारंभ बाबत परिचय सभागृहाला करून दिला. यावेळी अजित पवारांनी प्रसाद लाड यांच्या बाबत बोलताना, प्रसाद लाड यांचे लाड कुणी केले आणि त्यांनी प्रसाद कुणाला दिला हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

मनसे मधून आले आणि भाजपमध्ये इतके मोठे कसे झाले असा प्रश्न भाजप मधील इतर जेष्ठ नेत्यांना देखील पडला असेल, असही अजित पवार म्हणाले. वेगाने एखाद्याच्या जवळ जाण्याची कला प्रत्येकालाच जमत नसली तरी ती प्रविण दरेकरांनी इतर पक्षांना नाही तर किमान स्वपक्षीयांना तरी सांगावी अशी मिश्किल टीप्पणी पवार यांनी दरेकरांवर बोलताना केली.सदाभाऊ खोत आणि आणि विनायक मेटे यांच्यावर आहे त्यांनी राजकीय टिप्पणी केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय दौंड यांनी शिर्षासन केलं होतं. पण याकरता नियमीत व्यायाम करणे गरजेचं आहे. त्यामुळे कुणीही उठसुठ शिर्षासन करु नये. एम.डी नावाचे सहकारी असेच शिर्षासन करतानाच गेले असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे कुणीही असे धाडस करु नये. खाली डोकं वर पाय हे त्यांनी दाखवलेच आहे, असही अजित पवार म्हणाले.

विधान परिषदेतील या सदस्यांचा संपणार कार्यकाळ

सभापती रामराजे निंबाळकर, रविंद्र फाटक, प्रविण दरेकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, विनायक राऊत, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे.

Updated : 23 March 2022 1:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top