Home > Max Political > सगळे स्वार्थी लोक एकत्र येत आहेत, दादा भुसे यांचा हल्लाबोल

सगळे स्वार्थी लोक एकत्र येत आहेत, दादा भुसे यांचा हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरून मंत्री दादा भुसे यांनी टीका केली आहे.

सगळे स्वार्थी लोक एकत्र येत आहेत, दादा भुसे यांचा हल्लाबोल
X

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत दिल्ली सरकार संदर्भातील बिलाला राज्यसभेत विरोध करण्याचे आश्वासन मिळवले आहे. पण यावरून दादा भुसे यांनी केजरीवाल आणि ठाकरे-पवार भेटीवर निशाणा साधला.

सगळे स्वार्थी लोक एकत्र येत आहेत. कारण एकेकाळी हेच केजरीवाल शरद पवार यांच्याविषयी काय बोलायचे ते पाहिले पाहिजे. एवढंच नाही तर मागील काही दिवसात देशातील अनेक नेत्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहेत. दुसरीकडे विविध देशांचे पंतप्रधान मोदींच्या पाया पडत आहेत. त्यामुळे मोदी देशाचे नाव लौकिक वाढवत आहेत. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात देशातील सगळे स्वार्थी लोक एकत्र येत असल्याची टीका दादा भुसे यांनी केला.

Updated : 27 May 2023 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top