Home > Max Political > "नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल", अजित पवारांचं नाव न घेता उदयनराजेंची टीका

"नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल", अजित पवारांचं नाव न घेता उदयनराजेंची टीका

नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल, अजित पवारांचं नाव न घेता उदयनराजेंची टीका
X

अजित पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकीय वैर महाराष्ट्राला माहिती आहे. आज या दोघांमधील वादाने पुढची पायरी गाठली. सातारा शहरात एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलाबाबत बोलताना खासदार उदयनराजे यांनी अजित पवार यांच नाव न घेता "मला विरोध करणाऱ्यांना जोड्याने मारलं पाहिजे". अशा शब्दात टीका केली आहे.

ते म्हणाले

"अ‍ॅथेलिटीक ट्रॅक हे आयताकृती लागते ते तर गोल आहे. जोड्याने मारलं पाहिजे ज्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध केला आणि दाखवले की मी कारण नसताना विरोध करत आहे. हे कोणी केले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल म्हणून मी नाव पण घेत नाही. हे लोक जोड्यापुढे उभे करायच्या लायकीचे नाहीत. सगळीकडे घाण. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने घेऊ शकत नाहीत. यांनी सातारकरांनी संपूर्ण झिरो करायचेच ठरवले आहे. त्याला आयताकृती मैदान लागते कुठून करायचे?"

अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. पाहा काय म्हणाले उदयनराजे?

Updated : 2021-10-23T16:16:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top