Home > Max Political > मनोज जरांगेविरोधात छगन भूजबळांचे पुन्हा एकदा टिकास्ञ..! काय म्हणाले? वाचा

मनोज जरांगेविरोधात छगन भूजबळांचे पुन्हा एकदा टिकास्ञ..! काय म्हणाले? वाचा

मनोज जरांगेविरोधात छगन भूजबळांचे पुन्हा एकदा टिकास्ञ..! काय म्हणाले? वाचा
X

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा टिकास्ञ सोडलं आहे. 'मनोज जरांगेच्या मागण्या या मारोतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालल्या आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शिव्या घालत आहेत.त्यांचं शिक्षण नाही, कसला आभ्यास नाही तरीही ते कायम बडबड करत आहेत. आता बघू काय होतं ?' असं म्हणत छगन भूजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

भूजबळ बोलताना पुढे म्हणाले की, जे लोक कायदा हातात घेतील त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. मनोज जरांगेचे सहकारीच आता त्यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यामूळे त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे जरांगेच्या मागे नेमकं कोण आहे ? ते लक्षात येईल, असंही भुजबळं यावेळी म्हणाले.

मनोज जरांगेंचा सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न हा आरोपच हास्यास्पद आहे याला मी काय उत्तर देणार? मला जरांगेवर प्रश्न विचारु नका, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Updated : 26 Feb 2024 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top